खरा परमार्थी

खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्‍याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्याला इतर सर्वजण परमेश्वररूप भासतात.

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥
– संत तुकाराम महाराज

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील विश्लेषण पुढे दिले आहे.

कीर्तन आणि कीर्तनकार !

अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले. त्यांचा आदर्श घेऊन कीर्तनकारांनी स्वतःच्या मुख्य उद्देशापासून विचलित न होता कीर्तनसेवा द्यावी, हीच वारकर्‍यांची अपेक्षा !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली उत्तरप्रदेश येथील चि. आराध्या सहगल !

वर्ष २०१६ मध्ये देवाच्या कृपेने आम्हाला चि. आराध्या हे सात्त्विक कन्यारत्न प्राप्त झाले. तिच्या जन्मापूर्वी पू. तनुजा ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे केलेले गर्भसंस्कार आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत.

उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्या महंमद पैगंबर यांच्या चरित्रावरील पुस्तकाचे महंत यति नरसिंहानद यांच्या हस्ते प्रकाशन

या पुस्तकातून इस्लामी कट्टरतावादी विचारसरणी समजावण्यात आली आहे. इस्लाम कशा प्रकारे पसरला ? त्याचा उद्देश काय आहे ?, हे सर्व या पुस्तकातून लक्षात येईल.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथे प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक !

प.पू. काणे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नारायणगाव-पुणे येथे रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. श्रीपाद ठुसे आणि सौ. शीतल ठुसे यांनी पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला.

तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

सनातनचे पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेल्या ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’चा ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आलेला प्रसार !

गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या लेखात ग्रंथ अभियानाचा प्रसार ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमे (‘सोशल मिडिया’) यांच्या माध्यमातून कसा केला ? ते आपण पाहूया.