सनातनचे पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेल्या ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’चा ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आलेला प्रसार !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. मागील लेखात पू. रमानंद गौडा यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधकांनी अभियानासाठी केलेले प्रयत्न, यासमवेत साधकांच्या व्यष्टी साधनेत सातत्य ठेवण्याविषयी केलेले मार्गदर्शन आणि सर्वांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी केलेले प्रयत्न यांविषयी जाणून घेतले. या लेखात ग्रंथ अभियानाचा प्रसार ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमे (‘सोशल मिडिया’) यांच्या माध्यमातून कसा केला ? ते आपण पाहूया. (भाग ४)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/518018.html

१. ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून झालेला प्रसार

अ. ‘ग्रंथांचे महत्त्व सांगणारी माहिती (पोस्ट आणि चलत्चित्र (व्हिडिओ) पोस्ट) प्रसारित झाली.

आ. अभियानाचा प्रसार करणारे चित्र ‘डि.पि.’वर (‘व्हॉटस्ॲप’ या प्रणालीमध्ये डिस्प्ले पिक्चर’वर, नावापुढे दिसणारे चित्र) प्रसारित झाले.

इ. या माध्यमातून पाठवलेली सर्व माहिती (पोस्ट) १ लाख २३ सहस्र लोकांपर्यंत पोचली.

२. ‘व्हॉट्सॲप’स्टेटस वरील चित्रे पाहून जिज्ञासूंनी ग्रंथांची मागणी करणे

प्रसार करण्याच्या उद्देशाने साधक ‘व्हॉट्सॲप’च्या ‘स्टेटस’मध्ये ग्रंथांशी संबंधित काही चित्रे किंवा छायाचित्रे ठेवतात, ते पाहून काही जिज्ञासूंनी साधकांना संपर्क करून ग्रंथांची मागणी केली.

३. अभियानाविषयीची पोस्ट पाहून लोकांवरील आवरण न्यून होत असून त्यांना विषय ग्रहण करता येणे

अभियानाविषयीची बनवलेली एक एक पोस्ट पाहून लोकांवरील आवरण न्यून होत आहे. त्यांच्यावर उपाय होत आहेत आणि ‘त्यांना काय विषय आहे, हे ग्रहण करणे शक्य होत आहे’, असे आमच्या लक्षात आले.

४. चलत्चित्राच्या माध्यमातून चैतन्याचे प्रक्षेपण होत असल्याचे जाणवणे

उद्घाटनाचे चलत्चित्र (व्हिडिओ) पाहून बर्‍याच साधकांची भावजागृती झाली आणि त्यांना सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्या चलत्चित्राच्या माध्यमातून ‘सर्वांकडे चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे’, असे जाणवत होते.

५. सामाजिक माध्यमांतून मिळालेला उत्तम प्रतिसाद

सामाजिक माध्यमांमध्ये ग्रंथ अभियानाच्या ज्या ‘पोस्ट’ जात आहेत, त्या माध्यमातून पुष्कळ चैतन्य पसरत आहे आणि ‘समाजात वातावरण निर्माण करत आहेत’, असा अनुभव सर्वांना येत आहे. या अभियानाला सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून उत्तम प्रतिसाद मिळाला.

६. ज्ञानशक्ती अभियानाची झालेली प्रसिद्धी

अ. अभियानाचा प्रारंभ पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केला. अभियानाचे प्रसार करणारे चित्र (डि.पि.) आणि ‘पोस्ट’चे लोकार्पण केले.

आ. उद्घाटन सोहळा, ग्रंथांचे विषय आणि अभियान या संदर्भात प्रसिद्धीपत्रक (प्रेसनोट) करून सर्वांना पाठवले. ती बातमी १६ वर्तमानपत्रांमध्ये छापून आली.

इ. पत्रलेखन उपक्रमांतर्गत या विषयावरची ५ पत्रे पाठवली होती आणि ती ३५ वर्तमानपत्रांमध्ये छापून आली.

ई. २ लोकल दूरचित्रवाणी वाहिनीवर (टिव्ही चॅनलवर) ‘ग्रंथ अभियानाविषयी तळओळ (दूरचित्रवाणीच्या पडद्यावर खालच्या बाजूला वाक्य उजवीकडून डावीकडे जाते, तशी ओळ) घालून प्रसार केला जात आहे.

उ. ४ दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अभियानाचे चित्रीकरण झाले. ३ ठिकाणी प्रक्षेपण झाले. एका ठिकाणी प्रक्षेपण बाकी आहे.

ऊ. ५ आकाशवाणी (एफ्.एम्. रेडिओ) केंद्रांवर ध्वनीमुद्रण झाले. ४ ठिकाणी प्रसारण झाले आहे, बाकी एका ठिकाणी प्रसारण होणे बाकी आहे.

ए. संस्थेच्या सर्व ऑनलाईन सत्संगात शेवटी या अभियानाविषयी प्रसार करत आहोत.

ओ. एकूण ११५ ठिकाणी फलकप्रसिद्धी केली आहे.

औ. काही धर्मप्रेमींनी दुकान आणि त्यांची चारचाकी गाडी यांवर फलक लावून याचा प्रसार केला.’

– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. विजय रेवणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कर्नाटक (ऑक्टोबर २०२१)