सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद 

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

शासनाने महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळ स्थापन करून गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करावे !

अतिक्रमणे हटवली गेली नाहीत, तर एक दिवस या गड-दुर्गांचा खरा इतिहास पालटून त्यांचे इस्लामीकरण केले जाईल. अन्य राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीने गड-दुर्गांचे संवर्धन केले जात आहे, तसे महाराष्ट्रातही झाले पाहिजे.

राज्यातील सर्व गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त होईपर्यंत संघर्ष करत रहाणार ! – महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक सुनील घनवट  

आज महाराष्ट्रातील अनेक किल्ले भुईसपाट होण्याच्या मार्गावर असून प्रशासन, पुरातत्व विभाग, वनविभाग याविषयी सुस्त असून शिवप्रेमीही उदासीन आहेत. गड-दुर्ग म्हणजे पर्यटनाची ठिकाणे नसून ती पवित्र स्थाने आहेत.

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी मुंबईत महामोर्च्याद्वारे शासनाला आर्त साद !

छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक यांसह मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद घातली !

गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यशासनाकडून मान्य !

पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी स्वत: आझाद मैदानात येऊन गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी समयमर्यादा निश्‍चित करून राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे जतन आणि सवंर्धन यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासन श्री. मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.

छत्रपती शिवरायांचा वारसा जपण्‍यासाठी सिद्ध होऊया !

जागतिक कीर्ती मिळूनही छत्रपती शिवरायांच्‍या महाराष्‍ट्रात मात्र त्‍यांच्‍या गडदुर्गांची झालेली दुरवस्‍था पाहून शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांच्‍या माना लज्जेने खाली जात असल्‍यास नवल ते काय ?

गड-दुर्ग रक्षणाच्‍या कार्यात कसे सहभागी व्‍हाल ?

दुर्ग पर्यटन करणार्‍यांनो…! पर्यटकांनो, गडावर आपला दैदिप्‍यमान इतिहास अनुभवण्‍यासाठी जा. तेथे जाऊन केवळ छायाचित्रे किंवा ‘सेल्‍फी’ (स्‍वतःच स्‍वतःचे काढलेले छायाचित्र) काढण्‍यात वेळ न घालवता गड-दुर्ग यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घ्‍या. गडाच्‍या रक्षणकार्यात हातभार लावा !

हिंदूंचा स्‍वाभिमान दडपण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र !

शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्‍यात हिंदुत्‍वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्‍या या शक्‍तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्‍यंत्र आहे. शिवरायांना इस्‍लामप्रिय दाखवण्‍याचेही त्‍यांचे षड्‍यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्‍यासाठी संघटित व्‍हा !

‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना !

महाराष्‍ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी उत्‍स्‍फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना केली आहे.

गड-दुर्गांच्‍या दुर्दशेला कारणीभूत घटक !

गड-दुर्गांच्‍या दुःस्‍थितीच्‍या माध्‍यमातून शिवरायांचा ज्‍वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्‍याला पुनर्झळाळी मिळण्‍यासाठी सर्वंकष स्‍तरावर प्रयत्न व्‍हावेत !