माहीम गडावर अतिक्रमण करणार्‍यांना विनामूल्य सदनिका !

‘मुंबईत अवैध झोपडपट्टी बांधा, विनामूल्य घर मिळवा’, अशी महापालिकेची योजना आहे का ?

ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आमदार छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयीचे सूत्र लक्षवेधी सूचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित केले होते. 

श्रीक्षेत्र महांकाली, गुप्तेश्वर आणि अंजनेश्वर मंदिरे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरीत करा ! – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी

केंद्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्रातील संरक्षित स्मारकांचे केंद्रीय पुरातत्व विभाग स्वत: काम करत नाही आणि आम्हालाही एक इंचही पुढे जाऊ देत नाही !

मुंबईतील ‘शिवस्मारका’च्या उभारणीस विलंब होत असल्याचा ‘शिवस्मारक युवा संघर्ष समिती’चा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथील ‘शिवस्मारका’चे काम अद्याप सरकारद्वारे करण्यात आलेले नाही. या स्मारकासाठी वर्ष २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जलपूजन’ करण्यात आले होते; परंतु पुढील कार्य अद्याप चालू झालेले नाही.

नाशिक येथील सरकारवाडा, मालेगाव किल्ला आणि सुंदरनारायण मंदिर, तर जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण !

इतके अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यातील उत्तरदायींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे !

विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !

कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले.

अतिक्रमण कालमर्यादेत हटवून ज्या अधिकार्‍यांच्या कालावधीत झाले आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी ! – मनोज खाडये, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती

ज्या गडावर बांधकाम करण्यास तीनपट खर्च होतो, त्या गडावर तीन-तीन मजले बांधकाम होतांना संबंधित प्रशासकीय अधिकारी काय करत होते ?

ऐतिहासिक सज्जनगडावर लवकरच ‘रोप वे’ला प्रारंभ

श्रीक्षेत्र सज्जनगडावर प्रतिदिन असंख्य भाविक आणि पर्यटक येतात. यामध्ये वयस्कर लोकांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठ नागरिकांची ही समस्या दूर व्हावी, यासाठी ‘रोप वे’ची सुविधा व्हावी, ही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ !

७ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रमाणे ८ डिसेंबरला तात्काळ मोहीम राबवत प्रशासनाने विशाळगडाच्या पायथ्याला असलेली आणि जुन्या फरसबंदी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला आहे.

महाशिवरात्रीच्या अगोदर विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढण्याचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांचे आश्वासन !

विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक