खासदार साध्‍वी प्रज्ञासिंह यांची याचिका न्‍यायालयाने तात्‍पुरती स्‍वीकारली

मालेगाव बाँबस्‍फोट प्रकरण

खासदार साध्‍वी प्रज्ञासिंह

नाशिक – मालेगाव बाँबस्‍फोट प्रकरणातील संशयित त्‍याचप्रमाणे भाजपच्‍या खासदार साध्‍वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबई सत्र न्‍यायालयातील विशेष राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या (‘एन्.आय.ए.’च्‍या) न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे. या याचिकेत त्‍यांनी ‘मालेगाव खटल्‍याला विलंब होण्‍यासाठी ‘एन्.आय.ए.’कडून दोषमुक्‍त आरोपींविषयी संबंधित साक्षीदारांचा जबाब नोंदवण्‍यात येत आहे’, असा आरोप केला. यासह ‘अशा साक्षीदारांचा जबाब नोंदवण्‍यात येऊ नये, तसेच हा खटला जलदगती न्‍यायालयात चालवावा’, अशाही मागण्‍या केल्‍या. यावर १२ जानेवारी या दिवशी झालेल्‍या सुनावणीत न्‍यायालयाचे विशेष न्‍यायाधीश ए.के. लाहोटी यांनी दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकून ही याचिका तात्‍पुरती स्‍वीकारली. ‘एन्.आय.ए.’ने युक्‍तीवाद करतांना वरील आरोप फेटाळून लावले.