मथुरा (उत्तरप्रदेश) – भारतात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; पण आमच्या धर्मावर कुणी आक्रमण केले, तर त्याला असे प्रत्युत्तर दिले जाईल की, पळता भुई थोडी होईल, अशी प्रतिक्रिया भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी येथे व्यक्त केली. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.
साध्वी प्रज्ञा बोलीं-बागेश्वर वाले बाबा की शक्तियां सबको नहीं मिलतीं: धर्म पर आक्रमण किया तो ऐसा जवाब देंगे कि न जमीन मिलेगी न आसमानhttps://t.co/48xBZnXfC2#Pragyathankur #bagheshwardham #Prayagraj pic.twitter.com/AaR1qWvpUR
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) February 3, 2023
खासदार साध्वी प्रज्ञासिंह पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याविषयी म्हणाल्या की, धर्मविरोधी लोक सनातन धर्मावर आक्रमणे करतात. त्याचा सनातन धर्मावर कोणताही परिणाम होणार नाही. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या माध्यमातून हिंदु आणि हिंदुत्व वाढत आहे. भारत विश्वगुरु होता. भविष्यातही भारतमातेला परमवैभवावर पोचवून भारत विश्वगुरु पोचेल. याच अनुषंगाने धीरेंद्रकृष्ण शास्त्री काम करत आहेत.