रेल्वे पुलाच्या ठिकाणी अवैधपणे माती उत्खनन करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा ! – विशाल पवार

सांगली-कोल्हापूर या मार्गावरील एका नदीपात्रात खांब उभारण्यात येत आहे. हे बांधकाम चालू असतांना नदीपात्रातून कोणाचीही अनुमती न घेता मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येत आहे.

साम्यवाद , लोकशाही आणि विज्ञानवाद यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल ! – गिरीश पुजारी, मुख्य समुद्री अभियंता

साम्यवादी विचारातून हुकूमशाही, लोकशाही मार्गाने भांडवलशाही, तसेच विज्ञानवादाने भोगवाद निर्माण होत आहे. हे आज स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल.

सिंधुदुर्गातील कोरोनाची स्थिती

जिल्ह्यात २४ घंट्यांत नवीन २२ रुग्ण आढळले असून एकूण ५ सहस्र ८२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

सातारा येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ जणांना अटक

प्रजासत्ताकदिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

प्रजासत्ताकदिनी संगमनेर येथील ज्येष्ठ नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमानंतर २६ जानेवारी या दिवशी भूमीच्या वादातून अनिल शिवाजी कदम या ज्येष्ठ नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पोलिसांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध ! – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आणि कटीबद्ध रहाणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्यावेळी ते बोलत होते.

कृषी मंडळ कार्यालयाला आज टाळे ठोकणार ! – बांदा सरपंचांची चेतावणी

तालुक्यातील येथील बांदा विभागीय कृषी मंडळ कार्यालयासमोर २६ जानेवारीला ध्वजारोहण करण्यात न आल्याने बांद्याचे सरपंच अक्रम खान यांनी कार्यालयात जाऊन कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांना याविषयी खडसावले

सांगे येथेही आयआयटी प्रकल्प उभारण्यास विरोध

मेळावली, सत्तरीनंतर आता सांगे येथे आयआयटी प्रकल्पास विरोध होत आहे. सांगे येथे आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशासकीय संस्था आणि कार्यकर्ते यांची नुकतीच एक बैठक झाली.

तांडव वेब सिरीजवर बंदी घालण्याची आणि राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याची मागणी

उपविभागीय अधिकारी श्रीमती दिव्या अवस्थी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

अंबरनाथ-बदलापूर स्थानकांच्या दरम्यान रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र रुळावरून घसरले, १ ठार २ जण घायाळ

मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत