सातारा येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ जणांना अटक

सातारा, २८ जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताकदिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध घटनांमध्ये ५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविषयी पोलीस नाईक राहुल खाडे आणि सुनील कर्णे यांनी तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
मनोहर बापू सावंत, संतोष धोडिंबा वांगडे, राहुल मारुती वांगडे, गणेश पांडुरंग वांगडे, सुनील युवराज कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.