मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून जनतेला त्रास झाल्यास खपवून घेणार नाही ! – आमदार वैभव नाईक

शासनस्तरावर प्रतिवर्षी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी केले जाणारे प्रयत्न किती तकलादू आहेत, हे लक्षात येते, तसेच प्रतिवर्षी शासकीय कार्यालयातून दिली जाणारी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयीची शपथ, हाही एक ‘फार्स’ असल्याचे स्पष्ट होते !

मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !

चोराच्या उलट्या बोंबा ! हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले असतांना कोणी ही वस्तूस्थिती उघड करत असेल तर ते चूक कसे ?

बनावट धर्मपरिवर्तन दाखवून खातून बी सैय्यद गफ्फार या महिलेने अनुसूचित जागेवर सरपंचपद प्राप्त केल्याचा आरोप

जातीचे बनावट प्रमाणपत्र सिद्ध करणे आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल करणे या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य अन् प्रमोद भरत वाघुर्डे यांनी जालना, तसेच बुलढाणा येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करून सरपंचपद रिक्त करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

लातूर शहरासह आसपासच्या काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू !

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा, तसेच अहमदपूर नगरपालिका परिसरात २ मार्चच्या रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

अपघातग्रस्त डिझेल टँकरमधील सहस्रो लिटर डिझेल लुटले

यवतमाळ-वणी मार्गावरील शिवारात मध्यरात्री डिझेलच्या टँकरचे टायर फुटले आणि तो उलटला. याची वार्ता शेजारील गावांत पसरल्यावर क्षणार्धात टँकरमधील सहस्रो लिटर डिझेल लोकांनी लुटून नेले.

आयर्विन जवळील समांतर पुलाचे काम लवकर चालू करा; अन्यथा जनआंदोलन छेडू ! – धीरज सूर्यवंशी, भाजप

सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या दुरुस्तीसाठी सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्रासही सोसावा लागत आहे.

वर्ष २०२० मध्ये महापालिका क्षेत्रात जगले २३ सहस्र वृक्ष ! – सांगली महापालिका आयुक्त

हे वृक्ष लावतांना ६ फुटांपेक्षा अधिक उंची आणि २ वर्षे देखभाल या अटींवरच वृक्षारोपणाचे काम संबंधितांना देण्यात आले होते. त्यामुळे ९० टक्के झाडे जगवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या आरोग्यासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

स्थायी समितीने महापालिकेच्या निधीतून आणि खासगी भागीदारीतून शहरातील आरोग्यव्यवस्था सशक्त करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे.

उल्हासनगर येथे पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणार्‍या २ भावांना न्यायालयीन कोठडी

पोलिसांनी आशिष आणि आकाश त्रिपाठी या दोघा भावांविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, राजगुरु यांचे नाव घेतल्यावर आपल्या मनात निर्माण होते ते खरे ‘शौर्य’ ! त्यांचा आदर्श घेऊन हिंदूंनी संघटित होऊन भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करावा.