आयर्विन जवळील समांतर पुलाचे काम लवकर चालू करा; अन्यथा जनआंदोलन छेडू ! – धीरज सूर्यवंशी, भाजप

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (बसलेले) यांना निवेदन देतांना  १. धीरज सूर्यवंशी, तसेच अन्य

सांगली, ३ मार्च (वार्ता.) – सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या दुरुस्तीसाठी सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, बाजारासाठी येणार्‍या महिला, नोकरी-व्यवसायासाठी जाणारे युवक आणि नागरिक यांची मोठी ससेहोलपट होत आहे. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून शहराबाहेरून गेलेल्या पर्यायी पुलावरून यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्रासही सोसावा लागत आहे. तरी आयर्विन पुलाजवळील समांतर पुलाचे काम तातडीने चालू करावे, अन्यथा जनआंदोलन छेडू, अशी चेतावणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

या वेळी भाजप संघटक सरचिटणीस दीपक माने, सचिव विश्‍वजित पाटील, युवा मोर्चा संघटक सरचिटणीस किरण भोसले, उपाध्यक्ष कृष्णा राठोड उपस्थित होते.