लातूर शहरासह आसपासच्या काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू !

लातूर – जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा, तसेच अहमदपूर नगरपालिका परिसरात २ मार्चच्या रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांना सवलत देण्यात आली आहे.

‘मर्यादित विद्यार्थी संख्या, तसेच कोरोनाच्या सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या अटींवर येथील शिकवणी वर्ग चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे; मात्र नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास शिकवणी वर्गांविरुद्ध कारवाई करण्यात येईल’, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी या वेळी सांगितले.