आसगाव येथे साईबाबा घुमटीची तोडफोड

सोनारखेड, आसगाव येथील साईबाबा घुमटीची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार स्थानिकांनी हणजूण पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

नाशिक येथे प्लास्टिक बॉलमध्ये फटाक्यांची दारू सापडली

कुलकर्णी गार्डन परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर बॉम्बसदृश वस्तू सापडली. ती निकामी करतांना प्लास्टिक बॉलमध्ये फटाक्यांची दारू असल्याचे समजले. वेळीच अनर्थ टळला. या माध्यमातून भीती पसरवण्याचा हेतू असल्याचे समजते.

कॉटन ग्रीन आणि शिवडी या रेल्वे स्थानकांच्या मधे युवतीच्या हातातील भ्रमणभाषची चोरी

नागरिकांनो, लोकलच्या दरवाज्यात भ्रमणभाष घेऊन उभे रहातांना सतर्कता बाळगणेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या !

कोडोली (तालुका पन्हाळा) परिसरात चोरून होणारी गोहत्या थांबवा !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पोलीस ठाण्यात निवेदन

सांगली येथे काळ्या खणीतून १५ दिवसांत महापालिका कर्मचार्‍यांनी १३ टन कचरा काढला !

सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.

४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कसाल मंडळ अधिकारी संदीप हांगे निलंबित

लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील कसाल मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदी खताची सातबारावर नोंद करण्यासाठी संदीप हांगे यांनी संबंधिताकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून सातारा येथील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ची पहाणी

महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ला भेट देऊन पहाणी केली. तसेच विविध उपक्रमांची माहिती घेऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

१० मंगल कार्यालयांवर धडक कारवाई करत ७ सहस्र रुपये दंड वसूल

कोरोनाच्या दुसर्‍या साथीचा धोका रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण आणि ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर देण्याच्या सूचना महापालिका आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

अंगारकी चतुर्थीला पुणे येथील मोरया गोसावी गणपति मंदिर दर्शनास बंद रहाणार !

कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा आणि अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी यांमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय म्हणून तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २ मार्च या दिवशी बंद रहाणार आहे.

पुण्यात लसीकरणासाठी मोठी गर्दी; कमला नेहरू रुग्णालयात गर्दीमुळे गोंधळ !

लसीकरणाचे नियोजन भोंगळपणे करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद! ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी त्रास सोसावा लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे !