पुणे येथील ५ दुकानांना भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पिंपरी अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पहाटे ५ वाजता शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. रात्री दुकाने बंद असल्याने मोठी हानी टळली आहे.

मालेगाव (नाशिक) येथे हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून तिचा निकाह लावल्याविषयी तक्रार प्रविष्ट !

हिंदु मुलींवर बळजोरी करणार्‍या धर्मांधांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक !

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अपव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ‘ईडी’कडून अटक !

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अनुमाने ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना येरवडा कारागृहातून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या ६ मासांत २३७ गुन्हेगारांना अटक

गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्याचा विसर पोलिसांना अन्य वेळी पडलेला असतो का, असा प्रश्‍न सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?

मुख्याध्यापकांकडून १० वीमधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

सातारा येथे माथेफिरू टोळक्याचा धुडगूस 

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकामध्ये अज्ञात माथेफिरूंच्या टोळक्याने परिसरातील टपर्‍यांची तोडफोड करत धुडगूस घातला. यामध्ये हातावरचे पोट असणार्‍या टपरीधारकांची सहस्रो रुपयांची हानी झाली आहे.

तत्कालीन उपवनसंरक्षकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करणार ! – शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर 

आमदार केसरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात वनविभागाच्या विकासकामांसाठी आणि सौरऊर्जा कुंपणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. दोडामार्ग येथे प्राणी संशोधन केंद्र चालू झाले होते; परंतु चव्हाण यांच्या निष्क्रीय कारभारामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.

अंबाजी, फातोर्डा, मडगाव येथे दुहेरी हत्याकांड : २ वृद्धांची हत्या

अंबाजी, फातोर्डा येथे दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडाच्या घटनेने मडगाव येथे खळबळ माजली आहे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

मल्हारपेठ (जिल्हा सातारा) येथील अतिक्रमित झुणका-भाकर केंद्र प्रशासनाने पाडले !

पाटण तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या जागेतील वादग्रस्त झुणका-भाकर केंद्राचे अतिक्रमण प्रशासनाने पाडले. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार योगेश्‍वर टोपे यांनी हे अतिक्रमण पाडले. जिल्हा पुरवठा विभागाने शेवटची नोटीस देऊन संबंधित केंद्रचालकास म्हणणे मांडण्यास सांगितले.

नवसंदेश इमारतीच्या समोर रस्त्याच्या वळणावर असलेल्या चेंबरला झाकण लावण्याची मागणी !

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या महापालिका प्रशासनाला चेंबरचे साधे झाकणही लावता येत नाही हे आश्‍चर्यकारक आहे. झाकण उघडे राहिल्याने एखाद्या नागरिकाचा जीवही जाऊ शकतो !