सनातन धर्म आणि हिंदु राष्ट्र यांवषियी बोलणार्‍यांचे समर्थन करणार ! – योगऋषी रामदेवबाबा

बरेच लोक म्हणतात की, मी भाजपचा समर्थक आहे; मात्र हे चुकीचे आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे, तर सनातन धर्माचा समर्थक आहे. जो सनातन धर्म आणि हिंदु राष्ट्र यांवषियी बोलेल, मी त्याचे समर्थन करीन, असे वक्तव्य योगऋषी रामदेवबाबा यांनी केले.

वर्ष २०२४ पूर्वी समान नागरी कायदा लागू करा ! – योगऋषी बाबा रामदेव यांची मागणी

रामदेवबाबा पुढे म्हणाले की, ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम चालू झाले आहे.

योगऋषी रामदेवबाबा यांनी हिंदु तरुण-तरुणींसाठी आयोजित केला संन्यास महोत्सव !

योगऋषी रामदेवबाबा यांनी येत्या २२ मार्च ते ३० मार्च (श्रीरामनवमी) या कालावधीत संन्यास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात ज्यांना संन्यासी व्हायचे आहे, ते अर्ज करू शकणार आहेत.

जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जैन समाज हा दुसर्‍यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. जैन समाजाने संकटप्रसंगी देशाला भरभरून साहाय्य केले आहे. समाजाप्रती त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना ठाऊक आहे, असे गौरवोद्गाार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.

राष्ट्रवाद आणि अध्यात्मवाद भक्कम करणार्‍या पाठ्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल ! – योगऋषी रामदेवबाबा

भारताचा संपूर्ण जगात गौरव होईल, असे आत्मबळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती योगामुळे जागृत होत असते.

समस्त हिंदूंनी जातपात विसरून राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे ! – योगऋषी रामदेवबाबा

पतंजलि योगपीठ आणि श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि सनातन धर्मातील विविध घटक यांना संघटित करण्याचे महान कार्य पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करत आहेत.

दिवसातून एक घंटा योगासाठी द्या ! – योगऋषी रामदेवबाबा

गोव्यातील सर्व समुद्रकिनारे योगमय व्हावेत, तसेच सर्वांना योग आणि आयुर्वेद यांच्या माध्यमांतून सुदृढ आरोग्य लाभावे, यासाठी योगऋषी रामदेवबाबा, ‘पतंजलि योग समिती’ आणि कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ यांचा प्रयत्न आहे.

शिबिरासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उपस्थिती लावण्याचा आदेश मागे घ्यावा ! – काँग्रेस

काँग्रेसला पोटशूळ ! भाजप सरकार गोव्यातील पारंपरिक कार्निव्हल महोत्सवाला आळा घालत आहे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या शिबिराला शिक्षक, ‘एन्.सी.सी.’, ‘एन्.एस्.एस्.’ आणि ‘स्काऊट अँड गाईड’ स्वयंसेवक यांना बंधनकारक करत आहे.

लोकांना रोग आणि रोगांवरील औषधे यांमधून मुक्ती देण्यासाठी योग शिबिराचे आयोजन ! – योगऋषी रामदेवबाबा

सनातन धर्म हा सर्वसमावेशक आहे आणि यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. भारतियांच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये (गुणसूत्रांमध्ये) रोग नव्हे, तर योग आहे. योगऋषी रामदेवबाबा यांचे सनातन जीवन शैली अंगीकारण्याचे आवाहन !

योगऋषी रामदेवबाबा यांचे मिरामार समुद्रकिनार्‍यावर नि:शुल्क योग महाशिबिर !

‘पतंजलि योग पीठ’ हे जगातील सर्वांत मोठे योगपीठ आहे. योगऋषी रामदेवबाबा जीवन जगण्याची कला, नैतिक मूल्ये, प्राचीन परंपरेची शिकवण स्वत:च्या आचरणातून सर्वांना शिकवत आहेत.