भिंड – बरेच लोक म्हणतात की, मी भाजपचा समर्थक आहे; मात्र हे चुकीचे आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे, तर सनातन धर्माचा समर्थक आहे. जो सनातन धर्म आणि हिंदु राष्ट्र यांवषियी बोलेल, मी त्याचे समर्थन करीन, असे वक्तव्य योगऋषी रामदेवबाबा यांनी केले. ‘मी वैरागी आहे. माझे कुणाशीच काही देणे-घेणे नाही. जे सत्तेत आहेत आणि ते सनातन धर्माशी निष्ठा बाळगतात, त्यांचे तुम्ही समर्थन करा’, असेही आवाहन त्यांनी लोकांना केले. भिंड जिल्ह्यातील लहर येथे स्वामी चिन्मयानंद बापू यांनी ७ दिवसीय भागवत वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात रामदेवबाबा सहभागी झाले होते.
‘मानें या न मानें, देश के मुसलमान हमारे पूर्वजों की ही संतान’- बाबा रामदेव#BabaRamdev #MadhyaPradesh https://t.co/K8Bbfe24vd
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) April 11, 2023
ते पुढे म्हणाले की, हिंदू आणि मुसलमान यांचे पूर्वज एक होते. ते (मुसलमान) मानत नसले, तरी हिंदू त्यांना आपले मानतात. भारतात औरंगजेबाच्या शासनकाळात मुसलमानांची संख्या वाढली. त्याआधी येथे सर्व हिंदू होते.