(म्हणे) ‘राज ठाकरे यांनी धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये !’ – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

धर्मांमध्ये वाद कोण निर्माण करतो, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही ! मशिदींवर इतकी वर्षे अवैधरित्या भोंगे लावण्यात आले, याविषयी रामदास आठवले मुसलमानांना का खडसावत नाहीत ?

अक्षय्य तृतीयेला राज्यभरातील मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार !

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ३ मे या दिवशी राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत.

घटनाद्रोही आदेश !

‘नाशिक येथे मनसेचा अधिक जोर असल्याने असे करण्यात आले आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी नाशिक पोलीस हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न याद्वारे करत आहेत. त्यामुळे हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे अपरिहार्यच आहे !

(म्हणे) ‘अंगावर आलात, तर सोडणार नाही !’ – धर्मांध एस्.डी.पी.आय. संघटनेचे अजहर तांबोळी यांची धमकी

‘हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदे’ अशी आजची परिस्थिती असतांना अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याचे वारंवार खोटे सांगणारे धर्मांध !

संभाजीनगर येथे १ मे या दिवशी राज ठाकरे यांची, तर मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा !

१ मे म्हणजे महाराष्ट्रदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रदिनी मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

सर्व हिंदु बांधवांनी ३ मेपर्यंत सिद्ध व्हावे ! – राज ठाकरे

आमच्या मिरवणुका निघाल्यानंतर त्यावर दगडफेक होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही उचलता येतो. समोर असलेले शस्त्र आम्हाला उचलायला लावू नका !

राज ठाकरे यांच्याकडून खालकर चौक (पुणे) येथील हनुमान मंदिरात महाआरती !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून १६ एप्रिल या दिवशी खालकर चौक येथील हनुमान मंदिरात सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या वेळी खालकर चौकात शेकडो पुणेकर जमले होते.

स्वत:ची चूक वाटत असेल, तर शरद पवार यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी !

राज ठाकरे त्यांच्या भाषणात ‘राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणे लावण्याचे काम करण्यात आले’, असे जे म्हणाले, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही !

तलवार दाखवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा  नोंद करा ! – अविनाश जाधव, अध्यक्ष ठाणे आणि पालघर मनसे

महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी व्यासपिठांवर, तसेच सभेमध्ये तलवारी दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा नोंद झाला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चेतावणी जाधव यांनी दिली आहे.

ठाणे येथील सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा प्रविष्ट !

सभेसाठी राज ठाकरे उपस्थित होतांना त्यांचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जोरदार स्वागत केले. तेव्हा सभेचे आयोजन करणाऱ्या मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्याकडे तलवार सुपुर्द करत ती उपस्थितांना दाखवण्याचे आवाहन केले.