३ मेपर्यंत देशभरात मशिदींवरील भोंगे उतरवले गेलेच पाहिजेत !

३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवलेच गेले पाहिजेत. ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवले गेले नाहीत, तर अख्ख्या देशभर हनुमान चालिसा लागली पाहिजे, अशी चेतावणी १२ एप्रिल या दिवशी ठाणे येथील सभेत बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

(म्हणे) ‘राज ठाकरे यांचे वक्तव्य दंगली घडवणारे !’ – दीपाली भोसले-सय्यद, अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या

धर्मांध नेते जेव्हा हिंदू, हिंदु धर्म यांविषयी अनेकदा विखारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात, तेव्हा ‘अशा वक्तव्यांमुळे दंगली होतील’, असे दीपाली सय्यद यांना कधी वाटत नाही का ?

भोंग्यांचा धर्म आणि ‘राज’ कारण !

३ राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे, कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे, काश्मिरींवरील अन्यायाला अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने वंशविच्छेद घोषित करणे, हलालविरोधात जागृती होणे आणि परत अवैध भोंग्यांचा विषय वर येणे, हे कालसुसंगत घडत आहे. हिंदूंनी मात्र आता धर्माच्या बाजूने रहायचे कि अधर्माच्या याचा निर्णय वेळोवेळी घ्यायचा आहे !

जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार हेच उत्तरदायी ! – जनमताचा कौल

‘जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार उत्तरदायी’ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मताशी सहमत आहात का ?, असा मतचाचणीचा कौल २ एप्रिल या दिवशी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ या दैनिक ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर घेण्यात आला.

मशिदींवर भोंगे लावले, तर मंदिरावर दुप्पट आवाजात ‘हनुमान चालीसा’ लावा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

कोणत्या धर्मात लिहिले आहे की, मशिदींवर भोंगे लावा ? जेव्हा धर्म लिहिला गेला, तेव्हा भोंगे होते का ? युरोपमध्ये ध्वनीवर्धक कुठे आहेत ? तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करा; पण घरात राहून. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे.

घाटकोपर (मुंबई) येथे पोलिसांनी ध्वनीवर्धक जप्त करून मनसेच्या विभागप्रमुखांना घेतले कह्यात !

मशिदींवरील अवैध भोंगे काढण्याचे धाडस कोणतेही सरकार करत नाही, हे लक्षात घ्या !

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुराज्य पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले सुराज्य पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी शपथ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील कार्यक्रमात घेतली.

लोकांच्या समस्यांविषयी कुणालाच काही पडलेले नाही ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

विरोधक म्हणतात, सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालेत. सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकनेते ‘दि.बा. पाटील फेलोशिप’ची राज ठाकरेंकडून घोषणा

प्रकल्पग्रस्त आणि आगरी-कोळी समाजाचे दिवंगत ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांच्या सन्मानार्थ ‘दि.बा. पाटील फेलोशिप’ अर्थात् पाठ्यवृत्ती चालू होत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

एस्.टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या न करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन !

मी आत्महत्या करणार्‍यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना केले.