कोकण रेल्वेमार्गावर ५ जूनपासून ‘वन्दे भारत एक्सप्रेस ’ चालू होणार

‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्याला ६ दिवस चालवण्यात येणार आहे. मडगाव, थिविम्, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, मुंबई सी.एस्.एम्.टी. या स्थानकांवर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ थांबेल.

ईशान्य भारतातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन !

गौहत्ती ते न्यू जलपाईगुडी (बंगाल) असा या रेल्वेगाडीचा मार्ग आहे. हे अंतर ४११ कि.मी. इतके असून ते कापण्यासाठी अवघे ५ घंटे लागणार आहेत. देशातील ही ९वी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे.

कोकण रेल्वेचे श्री गणेशचतुर्थीसाठीचे आरक्षण काही मिनिटांतच पूर्ण झाल्याने प्रवाशांमध्ये संताप

केंद्रीय मंत्री राणे यांनीही यासाठी पुढाकार घेतला असून रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे निश्चित केले आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय होऊन कोकणात येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

वन्दे भारत एक्सप्रेसला चिपळूणला थांबा हवाच ! – शौकत मुकादम

‘सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या चिपळूण रेल्वेस्थानकात थांबवल्या जातील’, असे पत्र वीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेने कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीला दिले आहे. त्यामुळे दिलेला शब्द रेल्वे प्रशासनाने पाळला पाहिजे.

पार्सलचे ‘स्कॅनिंग’ करण्याचा पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय !

गेल्या वर्षी रेल्वेच्या पार्सल डब्यात स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी पार्सलने तलवारी पाठवण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. पुणे स्थानकावर यापूर्वी अनेकदा पार्सलद्वारे आलेला गुटखा पकडण्यात आला आहे.

धुळे-मनमाड-दादर एक्‍सप्रेसला आणखी ४ डबे जोडणार !

दैनंदिन चाकरमानी, व्‍यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी यांच्‍या मागण्‍या लक्षात घेऊन आता या गाडीस आणखी ४ नवीन डबे जोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ लवकरच धावणार !

लवकरच कोकण रेल्वे मार्गावरून ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ धावणार आहे. तिची चाचणी १६ मे या दिवशी घेण्यात आली. वर्ष २०२३ पर्यंत ७५ वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्या धर्मांधाला अटक !

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ झोपलेल्या एका प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्‍या मतीन अन्सारी (वय २२ वर्षे) या आरोपीला आर्.पी.एफ्.च्या जवानांनी रंगेहात पकडले.

भारत आखाती देशांशी थेट रेल्वे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात !

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असून तेथे त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यासह संयुक्त अरब अमिरात यांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

कोकणासाठी आणखी २६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्यानंतर गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी २६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.