अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने वाहतूक विस्कळीत !

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ लोकलगाडीचा डबा रुळावरून घसरला. साइडिंग मार्गिकेवरून मुख्य मार्गिकेवर रिकामी लोकलगाडी येत असतांना सकाळी ८.२५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

रेल्वेने प्रवास करतांना सामानाचे दायित्व हे प्रवाशांचेच असणार ! – सर्वोच्च न्यायालय

रेल्वेतून प्रवास करतांना प्रवाशांच्या वस्तूंच्या झालेल्या चोरीस रेल्वेच्या सेवेची न्यूनता म्हणता येणार नाही. वस्तूंची काळजी घेणे हे प्रवाशांचे दायित्व आहे. प्रवासी स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण करू शकत नसेल, तर रेल्वेला त्यास उत्तरदायी धरता येणार नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवला आहे.

गोवा : कोकण रेल्वे महिला पोलिसांनी रेल्वेस्थानकावर सापडलेली बॅग केरळच्या विद्यार्थिनीला केली परत !

कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर सापडलेली ४० सहस्र रुपयांचा ऐवज असलेली बॅग २ महिला पोलिसांनी प्रामाणिकपणे केरळ येथील विद्यार्थिनीला परत केली. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

१० जूनपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक पालटणार !

कोकण रेल्वेने पावसाळा चालू होण्यापूर्वीची सिद्धता चालू केली आहे. रेल्वे मार्गाशेजारील पाणी वाहून जाणार्‍या गटारांची स्वच्छता, मार्गावरील तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

तिरूपत्तूर (तमिळनाडू) येथे प्रेयसीशी झालेल्या भांडणातून तरुणाने केली रेल्वेच्या सिग्नल बॉक्सची हानी !

असे कृत्य करणार्‍याला कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !

ओडिशात पुन्हा झालेल्या अपघातात मालगाडीचे ५ डबे रुळावरून उतरले !

कोरमंडल एक्सप्रेसच्या नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर आता ओडिशा राज्यातच आणखी एका रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे.राज्याच्या बारगढ जिल्ह्यातील मेंधापाली गावाजवळ एका खासगी सीमेंट कारखान्याच्या आवारात एका मालगाडीचे ५ डबे रुळावरून उतरले.

रेल्‍वे अपघातांना पायबंद केव्‍हा ?

अपघात टाळण्यासाठी यंत्रणेचे सक्षमीकरण आणि दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या साहाय्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक !

ओडिशातील रेल्वे अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती ! – रेल्वे बोर्ड

बालासोर येथील रेल्वे अपघाताविषयी रेल्वे बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती देण्यात आली. बोर्डाच्या अधिकारी जया सिन्हा यांनी या वेळी सांगितले की, हा अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.

‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मधील पालटांमुळे झाला ओडिशातील रेल्वे अपघात ! – अश्‍विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

ओडिशातील बालासोर येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघातामागील कारण समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून अपघाताचे कारण स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबईत सांडपाण्‍यावर घेतले जाते भाज्‍यांचे पीक !

नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्‍वेच्‍या स्‍थानकांलगत पिकणार्‍या पालेभाज्‍या या गटाराच्‍या पाण्‍यावर पिकवण्‍यात येत आहेत आणि किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालक यांना त्‍या विकल्‍या जात आहेत.