वन्दे भारत एक्सप्रेसला चिपळूणला थांबा हवाच ! – शौकत मुकादम


चिपळूण – वन्दे भारत एक्सप्रेसला चिपळूणला थांबा हवाच, तसे न झाल्यास कोकणातील जनतेला रेल्वे ‘ट्रॅक’वर उतरावे लागेल, अशी चेतावणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे.

शौकत मुकादम पुढे म्हणाले की,

वन्दे भारत एक्सप्रेस

१. वन्दे भारत एक्सप्रेस २९ मेपासून चालू होत आहे. चिपळूण हे कोकणातील मध्यवर्ती ठिकाण असून रेल्वेस्थानकासाठी भरमसाठ जागा घेण्यात आली आहे.

२. ‘सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या चिपळूण रेल्वेस्थानकात थांबवल्या जातील’, असे पत्र वीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेने कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीला दिले आहे. त्यामुळे दिलेला शब्द रेल्वे प्रशासनाने पाळला पाहिजे.

३. थांबा नसलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या चिपळूणच्या रेल्वस्थानकात पाणी भरण्यासाठी थांबतात, मग थांबा देण्यास हरकत काय ?

४. कोकण रेल्वेचा तोटा भरून काढावयाचा असेल, तर चिपळूणच्या ‘जंक्शन’ रेल्वेस्थानकात न थांबणार्‍या गाड्या थांबवाव्याच लागतील.