पार्सलचे ‘स्कॅनिंग’ करण्याचा पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – गेल्या वर्षी रेल्वेच्या पार्सल डब्यात स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी पार्सलने तलवारी पाठवण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. पुणे स्थानकावर यापूर्वी अनेकदा पार्सलद्वारे आलेला गुटखा पकडण्यात आला आहे. यामुळे रेल्वे गाडी आणि प्रवासी यांची सुरक्षितता अनेकदा धोक्यात आल्याची स्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनाने वाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वेने पार्सलचे ‘स्कॅनिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्या पार्सलमधून नेमके काय जात आहे, याविषयी पारदर्शकता रहाणार आहे, तसेच संशयित वस्तू वा पार्सल यांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने २ स्कॅनिंग यंत्रे मागवली असून लवकरच त्या पुणे स्थानकावरील पार्सल कार्यालयात येणार आहेत.