लोकलगाडीत सोन्याचे दागिने चोरणारी टोळी अटकेत
त्यांच्याकडून १ लाख ९ सहस्र १८० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
त्यांच्याकडून १ लाख ९ सहस्र १८० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत ३ तरुणांनी २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. वासीम सय्यद, आरीफ खान, मुस्तकीम उपाख्य राजू सय्यद अशी त्यांची नावे आहेत.
रेल्वेने गाडीच्या जुन्या डब्यांचा वापर करून त्यातच उपाहारगृह चालू करण्याची अभिनव योजना राबवली आहे. पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्याचे रूपांतर करून उपाहारगृह उभारण्यात आले आहे.
मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणार्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत होते. रेल्वेने याची गंभीर नोंद घेतली असून दोषी कंत्राटदारांना ५ लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्कम २५ सहस्र रुपये होती.
कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी. यासाठी परप्रांतीयांची निवड होता कामा नये, अशी चेतावणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिले आहे.
भारतीय रेल्वेच्या ताफ्यात ३ सहस्र नवीन गाड्यांचा समावेश होणार असल्याने कोकणात जाण्यासाठी वर्ष २०२७ पर्यंत प्रवाशांना निश्चित तिकीट उपलब्ध होणार आहे. सध्या प्रतिदिन १० सहस्र ७४८ रेल्वेगाड्या धावत आहेत. हा आकडा १३ सहस्रांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी २० ते २७ नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेकडून वारकर्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांच्या सुविधेसाठी सी.एस्.एम्.टी. आणि दादर येथे सायंकाळी ६ ते रात्री १२.३०, ठाणे येथे सायंकाळी ७ ते रात्री १.३०, कल्याण येथे सायंकाळी ६ ते रात्री १.३० वाजता, एल्.टी.टी. येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १ पर्यंत आणि पनवेल येथे रात्री ११ ते २ वाजेपर्यंत फलाट तिकीट मिळणार नाही.
देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी कोलकातामध्ये धावणार आहे. भूमीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीतळाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात रुळ टाकण्यात आले आहेत.
वातानुकूलित लोकलची काच फुटली असून मोठी हानी झाली आहे, तर खिडकीजवळ बसलेली एक महिला किरकोळ घायाळ झाली आहे.