ठाणे, १० नोव्हेंबर (वार्ता.) – सकाळच्या गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलवर दगडफेक करण्यात आली. ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वेस्थानकांच्या दरम्यान सकाळी ८.३३ वाजताच्या सुमारास लोकल आल्यावर तिच्यावर मोठा दगड भिरकावण्यात आला. यात वातानुकूलित लोकलची काच फुटली असून मोठी हानी झाली आहे, तर खिडकीजवळ बसलेली एक महिला किरकोळ घायाळ झाली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर काही वेळ लोकलगाडी थांबवण्यात आली होती. सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिल्यावर २ गर्दुल्ल्यांना अटक करण्यात आली असून लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत ! – संपादक)