मुंबई ते अयोध्या रेल्वे चालू व्हावी ! – मुख्यमंत्री

मुंबई-अयोध्या रेल्वेगाडी चालू व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ३१ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जालना-मुंबई ही ‘वंदे भारत’ रेल्वे आल्यावर त्यांनी तिचे स्वागत केले.

मुंबई-रतलाम दरम्यान ‘कवच’ रेल्वे सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

विरार-नागदादरम्यान १४३ कि.मी.वर, तसेच मुंबई ते रतलाम दरम्यान ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टाळण्यासाठी स्वदेशी बनावटीची ‘कवच’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

आजपासून जालना-मुंबई ‘वन्दे भारत’ एक्सप्रेस चालू होणार !

मुंबई ते जालना ‘वन्दे भारत’ रेल्वे धावणार आहे. या रेल्वेची चाचणी २८ डिसेंबर या दिवशी पार पडली. ही रेल्वे २८ डिसेंबरच्या पहाटे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर पोचली.

Ayodhya New Airport : ‘महर्षि वाल्मीकि अयोध्या धाम’ असे असणार अयोध्येतील विमानतळाचे नाव

श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन ! याखेरीज अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Anti-National Muslims : रेल्वेतील लिपिकाने रेल्वेचा पैसा आतंकवाद्यांना दिल्याचे उघड !

या लिपिकाने रेल्वेकडे अनेक बनावट वैद्यकीय देयके सादर केली. त्या माध्यमातून मिळालेला पैसा त्याने आतंकवाद्यांना दिल्याचे उघड झाले. त्याला अटक केल्यानंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि ‘इंटरलॉकिंग’ या कामांसाठी ‘मेगाब्लॉक’

मिरज ते लोंढा आणि ‘कॅसलरॉक’ पर्यंत धावणार्‍या गाड्या या घटप्रभापर्यंत येतील आणि तेथूनच परत जातील.

२६ डिसेंबरला कोकण रेल्वेमार्गावर ‘मेगाब्लॉक’

मंगळवार, २६ डिसेंबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर दुपारी १२.४० ते १५.१० या कालावधीत अडीच घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’ करण्यात येणार आहे.

नागपूर मडगाव प्रतीक्षा द्वितीय साप्ताहिक एक्सप्रेसला मध्य रेल्वेकडून मुदतवाढ

विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे आणि प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती.

वर्दळीच्या अनेक रेल्वेस्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नियुक्त नसल्याने सुरक्षाव्यवस्था वार्‍यावर !

रेल्वेस्थानकावर पोलीस कर्मचारी नसणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी एक प्रकारचा खेळच आहे. कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यामध्ये हलगर्जीपणा करणारे दायित्वशून्य अधिकारी काय कामाचे ?

‘दादर’ रेल्वे स्थानकाचे नाव पालटण्यासाठी दादर (मुंबई) येथे भीम आर्मीचे आंदोलन !

दादरमध्ये चैत्यभूमी असल्याने येथील नागरिकांसह भीम आर्मीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्थानकाला मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे.