कोलकाता (बंगाल) – बंगालमदील हावडा येथे सिकंदराबाद-शालिमार या एक्सप्रेसचे ३ डबे रुळावरून घसरले; मात्र या घटनेत कुणीही गंभीररित्या घायाळ झाले नाही. ९ नोव्हेंबरला पहाटे ५.३० वाजता कोलकात्यापासून ४० किमी अंतरावर असलेल्या नालपूर येथे हा अपघात झाला. घसरलेल्या डब्यांमध्ये एक डबा पार्सल व्हॅनचा, तर २ प्रवासी डबे आहेत.
संपादकीय भूमिका :रेल्वेचे डबे सातत्याने रुळावरून घसरणे, हे मोठे षड्यंत्र असून त्याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे ! |