मंदिरातील पवित्र नौकेमध्ये बूट घालून छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी मल्ल्याळम् अभिनेत्रीला अटक आणि सुटका

हिंदूंच्या धार्मिक स्थळी बूट घालून छायाचित्रे काढताना अभिनेत्री निमिषा बीजो

थिरूवनंतपूरम् (केरळ) – हिंदूंच्या धार्मिक स्थळी बूट घालून छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मल्ल्याळम् दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेत्री निमिषा बीजो आणि त्यांची मैत्रिण उन्नी यांना अटक केली आहे. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. येथील पल्लियोडम् (नागाची पवित्र नौका) यामध्ये बूट घालून बसून निमिषा बाजो आणि उन्नी यांनी छायाचित्रे काढली होती. या प्रकरणी मंदिर समितीकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.