धोकादायक फेसबूक !

फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्‍या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी घातलेल्या काही संघटनांच्या नावांसह सनातन संस्थेचाही समावेश केला आहे.

होय, हिंदु जागा होत आहे !

सध्या मध्यप्रदेश राज्यात नवरात्रोत्सवात अहिंदूंना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. अहिंदूंच्या प्रवेशबंदीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना पुढाकार घेऊन धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील झाल्या आहेत. रतलाम येथे विश्व हिंदु परिषदेने श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

पंजाबमध्ये श्री चिंतपूर्णी देवीविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या शीख संपादकांना अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने त्यांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांना शून्य किंमत असल्याने संपादकांवर कारवाई होत नाही. याउलट अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला असता, तर कुणी तक्रार न करताच कारवाई करण्यात आली असती, हे लक्षात घ्या !

गुरुग्राम (हरियाणा) येथे मोकळ्या जागेत अवैधरित्या नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात हिंदु महिलांचे आंदोलन !

धर्मांधांवर कारवाई करावी लागू नये, यासाठी ‘हिंदूंनी नमाजपठणाची अनुमती दिली’, असे खोटे सांगणार्‍या पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक !

बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपर्वक भडकावण्यासाठी धर्मांधांकडून अशी कृत्ये केली जात आहेत. याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?

काश्‍मीरमधील हिंदूंच्‍या निर्घृण हत्‍येच्‍या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्‍या वतीने मुंबईमध्‍ये १६ ठिकाणी आंदोलने !

आतंकवाद्यांकडून काश्‍मीरमध्‍ये हिंदूंच्‍या चालू असलेल्‍या निर्घृण हत्‍यांच्‍या निषेधार्थ ९ ऑक्‍टोबर या दिवशी मुंबई येथे बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्‍या वतीने घाटकोपर, दादर आदी विविध १६ ठिकाणी आंदोलन करून याचा निषेध करण्‍यात आला.

ऑनलाईन वस्तू विक्री करणारे आस्थापन ‘नायका’कडून नवरात्रोत्सवामध्ये गर्भनिरोधकांवर सवलत !

बहुतांश हिंदू हे धर्माभिमानशून्य असल्यामुळे त्यांच्या श्रद्धास्थानांची आणि सणांची अशा प्रकारे अवहेलना होत असतांनाही ते निष्क्रीय रहातात. याविरोधात केंद्रातील आणि सर्व राज्यांतील सरकारांनी स्वतःहून कारवाई करत हिंदूंच्या धार्मिक भावनांचे रक्षण केले पाहिजे.

‘सीएट टायर’च्या विज्ञापनातून अभिनेते आमीर खान यांचा रस्त्यांवर फटाके न फोडण्याचा संदेश !

सातत्याने हिंदूंच्या सणांच्या वेळीच असे सल्ले कसे दिले जातात ? नाताळच्या वेळीही ख्रिस्त्यांकडून रस्त्यांवर फटाके फोडले जातात, तेव्हा कुणीच का बोलत नाही ? बकरी ईदला रस्त्यावर गोहत्या केली जाते, बकर्‍याची हत्या केली जाते, तेव्हा लोक विरोध का करत नाहीत ?

कर्नाटकातील नीलहळ्ळी गावात गावकर्‍यांचे फूस लावून धर्मांतर करणार्‍या ४ ख्रिस्ती धर्मप्रसारकांना अटक !

ख्रिस्ती धर्मप्रसारक भारतभर मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करत असतांना केंद्र सरकार धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी पावले का उचलत नाही ?

एमआयएमकडून संभल (उत्तरप्रदेश) शहराचा उल्लेख ‘गाझीं’ची (इस्लामी धर्मयोद्ध्यांची) भूमी’ !

मोगलांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारा एम्आयएम् पक्ष ! अशा पक्षावर बंदी घालण्याचीच मागणी हिंदूंनी केली पाहिजे !