सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या संगणकयुगातील दैनंदिन जीवनात नवनाथांचा आधार अनुभवा ! – नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके

नवनाथांनी अवतार घेऊन तप सामर्थ्याचे अलौकिक दर्शन घडवत आपल्यास जीवनोपयोगी संदेश दिले आहेत. ‘या संदेशरूपाने नवनाथांचा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या’, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.

पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून शोभायात्रेद्वारे नववर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत !

पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून आणि शोभायात्रेद्वारे नववर्षाचे नागरिकांनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय शहरातील छोट्या आणि मोठ्या मंदिरांत फुलांची आरास करण्यात आली होती. नागरिकांनी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.

बंगालमध्ये सीएए, एन्.आर्.सी. आणि समान नागरी कायदा लागू करू देणार नाही ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

संसदेने संमत केलेले कायदे लागू करू देणार नाही, म्हणणार्‍या ममता बॅनर्जी लोकशाहीद्रोही आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचे सरकार केंद्र सरकारने तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे !

उरुळी कांचनजवळील (पुणे) भवरापूर येथे ‘अंनिस’चा ‘स्मशान भेट’ कार्यक्रम !

भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत !

GITM 2024 :  पर्यटनस्थळाच्या मूळ संस्कृतीचा यथोचित सन्मान अन् प्रसार करणे आवश्यक !

कोणतेही पर्यटनस्थळ महान बनवणे एकट्याचे काम नाही. हे कार्य सरकार, स्थानिक जनता आणि खासगी क्षेत्र यांचे सामूहिक दायित्व आहे.

समुद्रकिनारे आणि ‘पार्टी लाईफ’ यांच्या पलीकडे पर्यटनाला व्यापक स्वरूप देणे आवश्यक ! – सुनील आंचिपाका, संचालक, गोवा पर्यटन विभाग

समुद्रकिनारे (बीच) आणि ‘पार्टी लाईफ’ (मेजवान्या करणे) यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या पर्यटनाला व्यापक रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, आस्थापने यांच्यासह जनतेच्या मानसिकतेतही पालट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

नाव पालटल्याने दुसर्‍याचे घर स्वतःचे होत नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

चीनला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला समजेल अशा भाषेतच आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे !

ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात ३० मार्चला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी जिल्ह्यातील ११ ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार यांचाही गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा साजरा झाला.

राजालाही पायउतार व्हावे लागते ! – प.पू सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाचे उत्थान अन् पतन यांवर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचेच दायित्व महत्त्वाचे असते.