यापेक्षा समान नागरी कायदा करा !

जोपर्यंत कुटुंबनियोजनाच्या संदर्भातील नियम बनवला जात नाही, तोपर्यंत आपण हम दो हमारे पांचचा संकल्प केला पाहिजे, असे विधान भाजपचे नेते विनीत अग्रवाल शारदा यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.

आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल !

संकटावर मात करून विकासाकडे वाटचाल ! – पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळ जिल्हा

अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलीदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदु मानून सरकार काम करीत आहे.

श्री बोडगेश्‍वरदेवाच्या जत्रोत्सवातील कार्यक्रम

बुधवार, २७ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता श्री देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सव उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात येणार आहे.

स्वयंपूर्ण आणि भांगराळे (सोनेरी) गोवा यांसाठी सरकार कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.

ऑनलाईन ज्ञानम् महोत्सवात हिंदु राष्ट्रविषयक विशेष परिसंवादात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

जयपूर (राजस्थान) येथे होणार्‍या ज्ञानम महोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांनी सहभाग घेतला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवक सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले 

या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रतिमा पूजन, विविध कार्यक्रम, उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याचसमवेत सांगली, विश्रामबाग आणि मिरज या नगरातील मुख्य चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आली.

काँग्रेसवाल्यांनीच नेताजी बोस यांची हत्या घडवून आणली ! – खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

हुन्नुरगी (कर्नाटक) गावातील बाळू बरगाले यांनी त्यांच्या नातवाचे नामकरण स्मशानभूमीत केले !

कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘‘स्मशानभूमीतील बारशाचा उपक्रम हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. लोकांनी श्रद्धेचे बाजारीकरण केल्यामुळे अंधश्रद्धा वाढली आहे.’’

या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल, तर शिवसेनाच हवी ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आकांक्षा होती की, शिवसेना संपूर्ण देशात गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची धडपड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी.