|
कोलकाता (बंगाल) – येथे येत्या २४ डिसेंबर या दिवशी गीता जयंतीनिमित्त १ लाख जण सामूहिक गीतापठण करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात आले असून त्यांनी ते स्वीकारले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. असे असले, तरी कोलकाता पोलीस आणि प्रशासन यांनी याला अद्याप अनुमती दिलेली नाही. हा कार्यक्रम नाताळच्या पूर्वसंध्येला असल्याने अनुमती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ३ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलl आहे. यासाठी गीतापठण समिती बनवण्यात आली आहे. १ लाख २० सहस्र लोकांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.
येथील ब्रिगेड मैदानात या पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली संतांच्या एका शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले.
(म्हणे) ‘धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न !’ – तृणमूल काँग्रेस
‘गीतापठण धार्मिक सौहार्द बिघडवते’, असे म्हणणारी तृणमूल काँग्रेस जिहादी संघटना आहे का ? असाच प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या बंगालमधील हिंदूंना हे मान्य आहे का ?
तृणमूल काँग्रेसने टीका करतांना म्हटले, ‘या कार्यक्रमाचे आयोजन धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न आहे.’ भाजपने म्हटले आहे की, हिंदु संस्कृती आणि धर्म यांचा सन्मान करण्याचा हा एक प्रकार आहे.
संपादकीय भूमिकागीतापठणाच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यास दिरंगाई करणारे तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यातील पोलीस ईदच्या आणि नाताळच्या कार्यक्रमांना अशी दिरंगाई कधी करतील का ? |