मालवण : नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकोट येथे शिवछत्रतींच्या पुतळ्याची उभारणी, तसेच तारकर्ली येथे होणार्या नौदलाच्या कवायती यांच्या अनुषंगाने सिद्धता पूर्णत्वाकडे जात आहे. यानिमित्त या परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण आणि रस्त्यांची कामे यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. २७ नोव्हेंबरपासून तारकर्ली येथे नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २६ नोव्हेंबर या दिवशी नौदलाच्या सैनिकांनी कवायती (परेड) केल्या. नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्गवासियांसह सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोचली असून आता सर्वांची दृष्टी ४ डिसेंबरच्या कार्यक्रमाकडे लागली आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी या कार्यक्रमाच्या सिद्धतेचा आढावा घेतला असून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
नौसेना दिनाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने ८ मोठ्या युद्धनौका, तसेच १० ते १२ लहान युद्धनौका सहभागी होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आय.एन्.एस्. विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. यासह अत्याधुनिक हेलिकॉप्टर, मिग-२९ के आदी लढाऊ विमानांच्या कसरती सादर केल्या जाणार आहेत. या सर्वांतून भारताच्या आधुनिक सैन्यशक्तीचे प्रदर्शन केले जाणार आहे. या सर्व कवायतींची रंगीत तालीम २७ नोव्हेंबरपासून चालू होणार आहे.
भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) पंतप्रधान @narendramodi यांच्या प्रमुख उपस्थितीत #सिंधुदुर्ग किल्ला येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते… pic.twitter.com/ehVAB1IPj4
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 22, 2023
हे ही वाचा –
♦ Sindhudurg Fort Foundation Day : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी सोहळ्याच्या वर्धापदिनानिमित्त मोरयाचा धोंडा येथे शासकीय पूजा
https://sanatanprabhat.org/marathi/741031.html