मंगलमय स्वस्तिक !

स्वस्तिकच्या प्रकरणात हिंदूंनी वेळीच आवाज उठवला नसता, तर कॅनडामध्ये त्याच्यावर बंदी घातली गेली असती. जागतिक पातळीवर हिंदूंना त्यांच्या अधिकारांसाठी वेळोवेळी लढावे लागते; मात्र हिंदूंमध्ये शुभ आणि मंगलमय असलेल्या स्वस्तिकसाठी हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला लढा हा नक्कीच आशादायी होता !

कॅनडामध्ये ‘स्वस्तिक’वर नाही, तर ‘नाझी हुक्ड क्रॉस’वर बंदी येणार !

कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे.

उत्तराखंड सरकारकडून चारधाम मंदिर व्यवस्थापन कायदा रहित !

आता केंद्रातील भाजप सरकारने देशभरातील सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

कुंकू, टिळा, टिकली आणि बांगड्या घालून येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍यांवर कारवाई केली जाईल ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची चेतावणी

अशी ठाम भूमिका घेणारे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांचे अभिनंदन !

आसाममध्येही संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधातील नावे पालटली जाणार !

आसाम सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

या कायद्यामुळे विवाह, घटस्फोट, भूमी, संपत्ती आणि सर्व लोकांसाठी वारसा यासंबंधी समान कायदे प्रदान केले जातील, असा विश्‍वास आहे. यामुळे सामाजिक सौहार्द वाढेल, महिला सक्षमीकरण होईल आणि सांस्कृतिक संरक्षण होण्यास साहाय्य होईल.

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये वैदिक गणिताच्या एक वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रारंभ

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये आता वैदिक गणिताचा डिप्लोमा अभ्यासक्रम प्रारंभ करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाईनही शिकता येणार आहे. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे.

‘हिंदु राष्ट्रा’ची राज्यघटना बनवण्यात येणार !

हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे.

भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा !

वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे.

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणे, हा गुन्हाच ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा होणे आवश्यक !