आसाममध्येही संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधातील नावे पालटली जाणार !

सूचना मागवण्यासाठी संकेतस्थळ चालू करणार असल्याची मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची घोषणा

आसाम सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – नावामध्ये पुष्कळ काही असते. प्रत्येक शहर, नगर आणि गाव यांची नावे, ही त्यांची संस्कृती अन् परंपरा प्रतिबिंबित करणारी असली पाहिजेत. आम्ही संपूर्ण आसाम राज्यामध्ये अशा ठिकाणांची नावे पालटण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी सूचना करण्यासाठी एक संकेतस्थळ चालू करत आहोत. याद्वारे आपली संस्कृती आणि परंपरा यांच्या विरुद्ध असलेले किंवा जात अन् समाज यांचा अवमान करणारे नाव पालटता येऊ शकते, अशा प्रकारचे ट्वीट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले आहे. यातून त्यांनी राज्यातील ठिकाणांची नावे पालटण्यात येणार असल्याचेच घोषित केले आहे.

यापूर्वीही सरमा यांनी याविषयीचे विधान केले होते. तेव्हा त्यांनी ‘कालापहाड’ याचे उदाहरण दिले होते. कालापहाड हा धर्मांध शासक होता. ‘कालापहाड याने प्रसिद्ध कामाख्या मंदिराला नष्ट केले होते. त्यामुळे कोणत्याही ठिकाणाचे नाव कालापहाड असू शकत नाही. लोकांच्या सूचनेनंतर हे नाव काढता येईल’, असे सरमा म्हणाले होते.