कुंकू, टिळा, टिकली आणि बांगड्या घालून येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍यांवर कारवाई केली जाईल ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची चेतावणी

अशी ठाम भूमिका घेणारे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांचे अभिनंदन ! – संपादक

कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश

बेंगळुरू (कर्नाटक) – कुंकू, टिळा, टिकली, बांगड्या आदी अलंकारिक वस्तू आहेत. विद्यार्थ्यांना यासाठी वर्गाबाहेर काढल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. शिक्षकांवर योग्य ती कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. देशाची संस्कृती आणि अलंकारिक वस्तू यांना हात लावू नये. सध्या गणवेशावरूनच चर्चा चालू आहे. अलंकारिक वस्तूंविषयी कुणी बोलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी.सी. नागेश यानीं येथे दिली.