राहुल गांधी यांनी तोडले चांद-तारे !
बेंगळुरू (कर्नाटक) – माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिशांना साहाय्य केलेली आहे आणि सावरकर ब्रिटिशांकडून मानधन घ्यायचे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाजप कोठेही नव्हता. हे सत्य भाजप लपवून ठेवू शकत नाही. काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनीच भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिदेत केला. राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’वर आहेत. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करणार आहेत. सध्या ही यात्रा कर्नाटकमध्ये आहे. या वेळी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
राहुल गांधी ने कर्नाटक में भारत जोड़ो यात्रा के दौरान प्रेस कॉन्फ्रेंस कर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर जमकर निशाना साधा https://t.co/GIpq1VZu1t
— AajTak (@aajtak) October 8, 2022
राहुल गांधी यांनी त्यांच्यावर होत असलेली टीका आणि समाजात त्यांच्या निर्माण करण्यात आलेल्या प्रतिमेवर बोलतांना म्हटले की, माझी चुकीची प्रतिमा उभी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली मोठी यंत्रणा कामाला लावण्यात आलेली आहे. मी वेगवेगळ्या कल्पक योजना घेऊन आलो, ज्याचा भाजप आणि आर्एस्एस्ला नेहमीच त्रास झालेला आहे. माझी चुकीची प्रतिमा उभी करण्यासाठी सहस्रो कोटी रुपये, तसेच शक्तीचा वापर करण्यात आला. समाजात माझी उभी करण्यात आलेली प्रतिमा चुकीची आहे. हे काम आगामी काळातही असेच चालू रहाणार आहे; कारण हे करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र आर्थिकदृष्या फार सक्षम आहे. (कुणाची प्रतिमा वाईट करण्यासाठी मुळात त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली असणे आवश्यक आहे. देशातील जनतेला राहुल गांधी यांची प्रतिमा आणि त्यांची बुद्धीची झेप किती आहे, हे आतापर्यंत ठाऊक झालेले आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|