सिंधुदुर्ग : तिलारी खोर्‍यातील हत्ती हटवा, अन्यथा त्यांना गोळ्या घालण्याची अनुमती द्या !

हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन आतंकवाद्यांकडून जनतेचे रक्षण काय करणार ?

‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची माहिती देण्यासाठी पुणे येथे पत्रकार परिषद पार पडली !

हिंदु जनजागृती समिती, खडकवासला येथील ग्रामस्‍थ आणि अन्‍य समविचारी संघटना यांच्‍या संयुक्त विद्यमाने गेली २० वर्षे ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीम राबवली जात आहे.

पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करा ! – पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल

ज्ञानप्रसारक मंडळाच्या संशोधन केंद्राने, गोवा सरकारचे पर्यावरण खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अन् गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांनी आगामी होळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग सिद्ध करून तो बाजारात उपलब्ध केला आहे.

मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’साठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार ! – किशोर घाटगे

मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चासाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी दिली.

मुंबईतील पत्रकार परिषदेतील मान्‍यवरांचे विचार !

राज्‍यातील ३५ महत्त्वाच्‍या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे त्‍वरित हटवा ! – श्री. सुनील घनवट

पुन्‍हा अन्‍वेषण करून ३ मासांत दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

करमुसे यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने जीतेंद्र आव्‍हाड यांना फटकारले असून या प्रकरणाचे पुन्‍हा अन्‍वेषण करण्‍याची करमुसे यांची मागणी मान्‍य केली आहे.

पाकमधील १८ श्रीमंतांकडील पैशांमुळे निम्मे कर्ज चुकवता येईल ! – सिराजुल हक, जमात-ए-इस्लामी

पाकमधील १८ श्रीमंतांची सूची माझ्याकडे आहे. त्यांच्या बँक खात्यांमध्ये ४ सहस्र कोटी रुपये आहेत. या १८ जणांमध्ये राजकीय नेते, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, सैन्याधिकारी आहेत. या सर्वांनी देशासाठी त्यांच्या पैशांचा त्याग केला पाहिजे.

शिरोळ तालुका (जिल्हा कोल्हापूर) समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २६ फेब्रुवारीला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

हिंदु मुली अन् माताभगिनी, तसेच संस्कृतीचा सर्वनाश करू पहाणार्‍या लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा करावा. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करावे, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूर येथे २६ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदू गर्जना मोर्चा’ !

येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ आणि ‘गोहत्‍या बंदी कायदा’ राज्‍यासह संपूर्ण देशात लागू करण्‍यात यावा या प्रमुख मागण्‍यांसाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

‘भुयारी गटार योजना’ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा उद्योग ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून शहरांमध्ये चालू असणारी ‘भुयारी गटार योजना’ म्हणजे भविष्यात पांढरा हत्ती पोसण्याचा उद्योग ठरणार आहे. ही भुयारी गटार योजना पुढे चालवणे अवघड असून या योजनेत अनेक त्रुटी आहेत.