सोलापूर येथे २६ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदू गर्जना मोर्चा’ !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ आणि ‘गोहत्‍या बंदी कायदा’ राज्‍यासह संपूर्ण देशात लागू करण्‍यात यावा या प्रमुख मागण्‍यांसाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या मोर्च्‍याचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्‍थानक येथून होणार असून मोर्च्‍याची सांगता हुतात्‍मा चार पुतळा येथे होईल. मोर्च्‍याच्‍या समारोपप्रसंगी हिंदुत्‍वनिष्‍ठ नेते धनंजय देसाई हे उपस्‍थितांना संबोधित करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्‍यात आली. या वेळी सर्वश्री संतोष कुलकर्णी, रवि गोणे, संजय जमादार, श्रीधर आरगोंडा, प्रशांत हल्‍संगी, प्रमोद एलगटी, अश्‍विनी चव्‍हाण, जयदेव सुरवसे, नागेश बंटी, रंगनाथ बंकापुरे आदी उपस्‍थित होते.