शिरोळ तालुका (जिल्हा कोल्हापूर) समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २६ फेब्रुवारीला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) – हिंदु मुली अन् माताभगिनी, तसेच संस्कृतीचा सर्वनाश करू पहाणार्‍या लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा करावा. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करावे, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील हिंदू बांधवांनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनआक्रोश समितीचे मुकेश दायमा यांनी गणपति मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. या मोर्च्यात हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर हे मार्गदशन करणार आहेत.

श्री. दायमा पुढे म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद, तसेच धर्मांतराची मोठी समस्या सध्या हिंदु समाजासमोर आहे. यामुळे संपूर्ण सामाजिक सौहार्द बिघडत चालले आहे. आपल्या बहुतांश हिंदु कुटुंबियांना लव्ह जिहाद म्हणजे काय ? त्याचे हिंदु धर्मातील महिलांचे होणारे शोषण यांची कोणतीच कल्पना नाही. याची जाणीव होण्यासाठी समस्त शिरोळ तालुका हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने लव्ह जिहाद विरोधात मोर्च्याचे आयोजन केले आहे. दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून मोर्च्यास प्रारंभ होईल. पालिका चौक, थिएटर चौक, सन्मित्र चौक, नवबाग रस्त्यावरून जुने बस स्थानक चौकातील कन्याशाळेच्या मैदानावर सभेत रूपांतर होणार आहे.’’

या प्रसंगी सर्वश्री दिलीप पटेल, गौतम पाटील, निवृत्त मेजर सुनील पाटील, ओंकार माळी, नंदकिशोर बुरुड, अमृत चोपडे, नितीश आंबी, योगेश जमदग्नी, विनोद तनपुरे, मंदार पाटुकले, शीतल मांजरे, प्रवीण गायकवाड उपस्थित होते.