सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त राबवलेल्या उपक्रमाला वरळी, मुंबई येथे मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘जगभरातील सर्व हिंदूंसाठी प्रार्थना करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘एकमेव गुरु’ आहेत !’ – एका मंदिरातील पुजार्‍याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

श्रीविष्णूचा अवतार असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी रामनाथी आश्रमात पंढरपूर येथून आणलेल्या काही वस्तू आणि छायाचित्रे यांचे प्रदर्शन लावणे अन् त्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या मंदिरातील तळघरात श्रीविष्णु बालाजीची मूर्ती सापडणे

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे जीवनाडीपट्टीच्या वाचनातून महर्षींनी वेळोवेळी सांगितले आहे. महर्षींच्या मार्गदर्शनानुसार मागील काही वर्षे त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

पू. शिवाजी वटकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी आणि सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात त्यांच्याच कृपेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाली. ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी, हा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील रथयात्रेच्या वेळी सौ. सुजाता रेणके यांना आलेल्या अनुभूती !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव पहाण्याची मला सुवर्णसंधी मिळाली. त्या वेळी मला आलेले काही अनुभव आणि अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सात्त्विकता आणि चैतन्यशक्ती असलेला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ !

या ग्रंथातील गुरुदेवांच्या विविध भावमुद्रा, त्यांचे सुंदर आणि मनमोहक हास्य अन् कृपावत्सल दृष्टी दर्शवणारी छायाचित्रे पाहून साधकांची भावजागृती होते. हा ग्रंथ हातात घेतल्यावर प्रसन्नता जाणवणे, भाव दाटून येणे, आनंद अनुभवणे, शांत वाटणे इत्यादी अनुभूती साधक आणि वाचक यांना येत आहेत.

वैशाख मासात झालेल्या जन्मोत्सवातही उन्हामुळे कोणताही त्रास न होता साधकांनी अनुभवला श्रीगुरूंचा जन्मोत्सव !

‘२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव झाला. या जन्मोत्सवाच्या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमापासून ते नागेशीपर्यंत रथोत्सव साजरा करण्यात आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावरील अमूल्य मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ ‘संगीतातून साधना करू इच्छिणार्‍या व्यक्तींना व्हावा’, या दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे येथे दिली आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडला नवचंडीयाग !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सनातनचे संत यांच्या वंदनीय उपस्थितीत हा याग करण्यात आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मिळालेल्या ‘दैवी प्रचीती’ आणि त्यामागील शास्त्र !

कमलपिठात उमललेल्या कमळाकडे पाहिल्यावर भगवान विष्णूच्या कमलनयनांची (कमळांसारखे असलेले नयन) आठवण होते. एका कमळाचे तोंड रामनाथी आश्रमाकडे आणि दुसर्‍या कमळाचे तोंड बाहेरच्या दिशेने असणे, याचे दोन भावार्थ आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अनुभवलेली त्यांची कृपा !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे जायचे आहे’, असे समजल्यापासून त्यांचे चैतन्य वातावरणात कार्यरत झाले आहे’, असे वाटणे आणि घरात दैवी कण आढळणे