Shankhnad Mahotsav Delhi : देहलीत होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण
‘सनातन राष्ट्र’ स्थापनेचा उद्देश प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम्मधील सभागृह क्रमांक १२ मध्ये होणार्या या महोत्सवासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी उपस्थितीविषयी सकारात्मकता दर्शवली आहे.