तुलिंज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यातील हवालदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मानसिकदृष्ट्या स्वतःच खचलेले असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

पुणे येथे पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार

पोलीस कर्मचार्‍यांच्याच मुली सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्यांच्या मुलींच्या सुरक्षेची काय स्थिती असेल ?

श्रीलंकेमध्ये महिला अधिवक्त्याकडून फेसबूकवर श्री महाकाली देवीचे अश्‍लील चित्र पोस्ट करून अवमान

केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

बिहारमध्ये धर्मांधांकडून शिक्षिकेचे अपहरण

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज ! येथे महंमद फिरोज उपाख्य अफरोज याच्यासह २० जणांनी शस्त्राचा धाक दाखवत एका २२ वर्षीय शिक्षिकेचे अपहरण केल्याची घटना घडली.

उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

अवैध मद्याची वाहतूक करतांना उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष कृतीदलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी २२ डिसेंबरला सावंतवाडी येथील तिघांना अटक केली होती.

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ३ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा नोंद

आरोपींनी स्वतःच्या अधिकारांचा अपवापर करून अवास्तव आणि १३ खोटी कर्ज प्रकरणे संमत केलेली आहेत. 

दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यावर भाविकांना निर्बंध, तर पर्यटकांना मात्र सवलत

नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने गड-किल्ल्यांवर होणार्‍या ‘मद्य पार्ट्या’ यांवर अजून तरी कोणतेही निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. हा पोलिसांचा दुटप्पीपणा नव्हे का ?

लाच मागितल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील तलाठी आणि कोतवाल कह्यात

शेतभूमीच्या फेरफारमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच मागणारे तलाठी बेले आणि कळमनुरी तहसील कार्यालयातील कोतवाल शेख हमीद या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले.

गुन्हेगारीत बिहार राज्यातील पाटणानंतर महाराष्ट्रातील नागपूर दुसर्‍या क्रमांकावर !

नागपूरला ‘गुन्हेगारी शहर’(क्राईम सिटी) म्हणूनही संबोधले जात आहे.