दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यावर भाविकांना निर्बंध, तर पर्यटकांना मात्र सवलत

हा पोलिसांचा दुटप्पीपणा नव्हे का ?

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, २३ डिसेंबर (वार्ता.) – सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर खंडाळा तालुक्यातील पाडेगाव-निरा येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात प्रतिवर्षी दत्त जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडतो; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबर या दिवशी हा उत्सव करण्यावर पोलीस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्याविषयीची बैठक नुकतीच मंदिरात पार पडली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सवही मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते दशमी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; मात्र भाविकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने यंदाचा सोहळा भाविक-भक्तांनी घरीच साजरा करण्याचे आवाहन ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी केले आहे.
दुसरीकडे मात्र महाबळेश्वरसारख्या ठिकाणी पर्यटकांच्या अमर्याद गर्दीवर पोलीस प्रशासनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने गड-किल्ल्यांवर होणार्‍या ‘मद्य पार्ट्या’ यांवर अजून तरी कोणतेही निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत.