सरकारी अधिवक्‍त्‍यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे न्‍यायालयासमोर सादर न केल्‍याने त्‍यांना १ रुपया दंड करावा ! – अधिवक्‍ता अनिल रुईकर

कॉ. गोविंद पानसरे प्रकरणाची २१ नोव्‍हेंबरला न्‍यायालयात नियमित सुनावणी होती. सुनावणी चालू झाल्‍यावर एका साक्षीदाराला साक्षीसाठी बोलावण्‍यात आले होते. ज्‍या विषयाच्‍या संदर्भातील साक्ष होती, त्‍याची मूळ कागदपत्रेच नसल्‍याचे विशेष सरकारी अधिवक्‍ता हर्षद निंबाळकर यांच्‍या लक्षात आले.

अधिवक्‍ता इचलकरंजीकर आणि अधिवक्‍ता रुईकर यांच्‍याकडून साक्षीदारांच्‍या साक्षीतील विसंगती अन् फोलपणा न्‍यायालयात उघड !

साक्षीदाराने प्रत्‍यक्षात नोंदवलेली आणि न्‍यायालयात दिलेली साक्ष यांत अनेक विसंगती असून त्‍यातील फोलपणा ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता अनिल रुईकर अन् अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणीत न्‍यायालयात उघड केला.

समीर गायकवाड यांच्‍या ध्‍वनीमुद्रणातील सर्वच मजकूर पंचनाम्‍यात का नाही ? यावर उत्तर देण्‍यास पंच असमर्थ !

समीर गायकवाड यांच्‍या ध्‍वनीमुद्रणाविषयी जो पंचनामा सादर केला आहे, त्‍यात प्रत्‍यक्षात झालेले संभाषण आणि नोंद केलेला मजकूर यात काही वाक्‍ये गाळण्‍यात आलेली आहेत, ती का गाळण्‍यात आली आहेत ?

‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला !

गरवारे महाविद्यालयाच्‍या जवळील ‘कोहिनूर मंगल कार्यालय’, कर्वे रोड येथे ८ ऑक्‍टोबर या दिवशी डॉ. अमित थढानी यांनी लिहिलेल्‍या ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

पंचनाम्‍यातील अनेक नोंदी पोलिसांनी सांगितल्‍यामुळे पंचांनी नमूद केल्‍या ! – अधिवक्‍ता अनिल रुईकर

घरझडतीत जप्‍त केलेली पुस्‍तके आणि पत्रके यांवर समीर गायकवाड यांचे नाव नाही, ‘एखाद्या गोष्‍टीचे प्रबोधन करणे’ म्‍हणजे आक्षेपार्ह आहे का ? समीर गायकवाड यांच्‍या ‘डायरी’त अनेक नावे आणि लिखाण असतांना केवळ एका विशिष्‍ट व्‍यक्‍तीचेच नाव पंच पटेल यांनी नमूद केले.

पंचनाम्‍यात नमूद केल्‍याप्रमाणे ‘वस्‍तू आक्षेपार्ह नाहीत’, म्‍हणजे काय ?, यावर उलटतपासणी उत्तर देण्‍यास पंच असमर्थ !

‘सत्‍यजित गुरव हे पंच पोलिसांना साहाय्‍य करण्‍यासाठी साक्ष देत आहेत, हेच सिद्ध होते’, असे अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले.

उलट तपासणीत अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्‍यास पंच सुभाष वाणी असमर्थ !

कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू असून ३ आणि ४ जुलै या दिवशी संशयितांच्‍या वतीने ६ अधिवक्‍त्‍यांनी पंच वाणी यांची उलटतपासणी केली.

कॉ. पानसरे हत्‍येच्‍या अन्‍वेषणासाठी न्‍यायालयाकडून ३ मासांची मुदतवाढ !

अन्‍य हत्‍यांच्‍या प्रकरणांशी जोडलेले असल्‍याचे कारण देत आतंकवादविरोधी पथकाने कॉ. गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍येच्‍या अन्‍वेषणासाठी मुदत वाढवून देण्‍याची मागणी २८ जून या दिवशी मुंबई उच्‍च न्‍यायालयात केली.

पोलिसांनी शिकवल्‍यानुसार पंच नितीन जाधव साक्ष देत आहेत ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

संशयित आरोपीच्‍या अधिवक्‍त्‍यांनी समीर गायकवाड यांच्‍या अटकेचा पंचनामा करणारे पंच नितीन जाधव यांची उलट तपासणी घेतली. त्‍या वेळी पंच नितीन जाधव यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर न देता वेळकाढूपणा करत होते, तसेच एकाच प्रश्‍नाची वेगवेगळी उत्तरे देत होते.

‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.