सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप पाऊस चालू आहे. त्यामुळे भातशेतीसह अन्य पिके आणि बागायती यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा.

दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना हानीभरपाईसाठी ८ कोटी संमत !

तालुक्यातील अनेक शेतकरी शासनाकडून साहाय्य मिळण्याच्या प्रतीक्षेत होते; मात्र आमदार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी असंख्य वेळा पाठपुरावा केल्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी हा निधी संमत केला आहे.

आंध्रप्रदेशात पुरामुळे १७ जणांचा मृत्यू, तर १०० जण बेपत्ता

वायूदल, ‘एस्.डी.आर्.एफ्.’ आणि अग्नीशमन दल यांच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आले आहे.

तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे १४ जणांचा मृत्यू

पावसामुळे विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवस तमिळनाडूच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका ! – मेधा पाटकर

विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला.

अणाव, हुमरमळा येथे घरावर वीज पडून ८० सहस्र रुपयांची हानी

सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, पोलीस पाटीलआदींनी दळवी यांची भेट घेऊन दळवी कुटुंबियांना धीर दिला.

अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा ! – चीन सरकारचा नागरिकांना आदेश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे दिले कारण
चिनी नागरिकांना मात्र तैवानशी युद्ध होण्याचा संशय

लडाखच्या सीमेवरील उंच चौक्यांवर तैनात चिनी सैनिकांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होत आहेत मृत्यू !

भारतीय सैनिकांना इतक्या उंचीवरील चौक्यांवर रहाण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण आहे; मात्र चिनी सैनिकांना ते कठीण जात आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक चिनी सैनिकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

वेंगुर्ले शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ वर पडलेले झाड अखेर ५ मासांनंतर हटवले

शाळेवर पडलेले झाड वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या मालकीचे असल्याने ते ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने तोडायचे कि पंचायत समिती प्रशासनाने ? असा प्रश्‍न निर्माण झाला होता; मात्र उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांच्या पुढाकाराने तो प्रश्न निकाली निघाला.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : २६ जणांचा मृत्यू

राज्यातील पठाणमथिट्टा, कोट्टायम्, एर्नाकुलम्, इडुक्की आणि त्रिशूर या ५ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.