केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : २६ जणांचा मृत्यू

केरळमधील पूरस्थिती

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. पुरामुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील पठाणमथिट्टा, कोट्टायम्, एर्नाकुलम्, इडुक्की आणि त्रिशूर या ५ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् म्हणाले की, अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारतीय हवामान विभागाने राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची चेतावणी दिली आहे.