कुडाळ – तालुक्यातील अणाव, हुमरमळा येथील प्रभाकर दत्ताराम दळवी यांच्या घरावर ५ नोव्हेंबरला सायंकाळी वीज पडून ८० सहस्र रुपयांची हानी झाली. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू लागला आणि थोड्या वेळातच दळवी यांच्या घरावर वीज कोसळून घरातील वीजमीटर जळून गेला. घराच्या भिंतींना तडे गेले, तर घरातील वीजवाहिन्याही (वायरींगही) जळून गेल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती जयभारत पालव, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळू पालव, पोलीस पाटील उत्तम पालव आदींनी दळवी यांची भेट घेऊन दळवी कुटुंबियांना धीर दिला. गेले काही दिवस सतत पडणार्या पावसामुळे शेतकर्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.