लडाखच्या सीमेवरील उंच चौक्यांवर तैनात चिनी सैनिकांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होत आहेत मृत्यू !

नवी देहली – लडाखच्या गलवान खोर्‍यात गेल्या वर्षी भारत आणि चीन यांच्या सैनिकांत झालेल्या संघर्षानंतर अद्यापही तेथे तणावाची स्थिती कायम आहे. तेथे दोन्ही देशांकडून मोठ्या संख्येने सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तेथील अनेक चौक्या अत्यंत उंचावर आहेत. भारतीय सैनिकांना इतक्या उंचीवरील चौक्यांवर रहाण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण आहे; मात्र चिनी सैनिकांना ते कठीण जात आहे. येथे तैनात करण्यात आलेल्या अनेक सैनिकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. यामागे ऑक्सिजनची कमतरता, हेही एक कारण आहे. यामुळे चीन चिंतेत आहे.

हिमालयातील उंचीवर चौक्यांच्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. यामुळे चिनी सैनिकांना श्‍वास घेण्यास अडचण होत आहे. त्यामुळे चीनकडून आता त्यांच्या सैनिकांना विशेष बनवण्यात आलेले ऑक्सिजन उपकरण उपलब्ध करून देत आहे.