|
बीजिंग (चीन) – कोरोनाचा वाढलेला संसर्ग आणि मुसळधार पाऊस यांमुळे भाज्या अन् इतर वस्तू यांच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा, असा आदेश चीनने त्याच्या नागरिकांना दिला आहे; मात्र चीन तैवानशी युद्ध घोषित करण्याच्या सिद्धतेत असल्याने हा आदेश देण्यात आल्याचा संशय चिनी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या आदेशामुळे अन्नधान्य, मीठ, साखर, तेल यांसारख्या वस्तूंना असलेली मागणी वाढल्याने अनेक भागांत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. चीन आणि तैवान यांच्यात बर्याच कालावधीपासून तणावाची स्थिती असून गेल्या काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळली आहे. चीनने वारंवार तैवानला कारवाईची धमकी दिली आहे.
China urges families to store basic supplies in case of emergency https://t.co/i2HB5v3sx3
— BBC News (UK) (@BBCNews) November 2, 2021