गोमूत्राचा असा लाभ आहे, तर सर्वत्र गोहत्याबंदी का करत नाही ?

येथील भाजपचे आमदार देवेंद्रसिंह लोधी यांनी ‘प्रतिदिन २५ मिली गोमूत्र प्यायल्यास कोरोना आणि कर्करोग यांसारखे आजार होणार नाहीत’, असा दावा केला आहे.

भारतातील किती उद्योगपती टाटांसारखे दानशूर आहेत ?

‘टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् यांच्या पुढाकाराने टाटा समूहाने कोरोनाच्या संकटात साहाय्य करण्यासाठी ‘नो लिमिट’ (अमर्यादित) साहाय्याची योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी २ सहस्र कोटी रुपये व्यय करणार आहे.

हे सरकारला लज्जास्पद !

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत.

हे हनुमंता, हिंदु राष्ट्र स्थापण्या दे आम्हा दास्यभाव अन् क्षात्रभाव यांचे वरदान !

रामचरणांच्या नित्य अनुसंधानात रहाणार्‍या महातेजस्वी हनुमंता, रामभक्ती आणि वीरवृत्ती यांच्या बळावर तू राक्षसांचा निःपात करून रामरायाचे धर्मसंस्थापनेचे ध्येय पूर्ण केले.

पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती !

पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची  हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २५.४.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

धर्मांतराचे दुष्परिणाम !

‘काही धर्मांतरित हिंदू पूर्वी ते ज्या जातीत होते, त्यांना मिळणारा लाभ उठवतातच. त्यासह धर्मांतर झाल्यानंतर अल्पसंख्यांक होण्याचाही लाभ उठवतात.

भारतियांची चीनविरुद्धची मवाळ नीती पालटायला हवी ! – अभिजित अय्यर-मित्रा, संरक्षण आणि विदेशनीती विशेषतज्ञ

व्हिएतनामसारखे राष्ट्र चीनला अनेक वेळा नमवते. आपण भाषण देण्यामध्ये चांगले असण्यापेक्षा रणनीती चांगली करण्यामध्ये प्रयत्न करायला हवेत.

इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

भारतीय सैन्य जगातील कोणत्याही सैन्याच्या तोडीस तोड आहे. पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणी आल्यास ते भारताला त्रास देतात. ही त्यांची नित्याची रणनीती आहे.

ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने यात पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आज जर आपल्या मंदिरांना वाचवायचे असेल, तर ‘एंडोव्हमेंट’ कायदा रहित करणे, हाच एकमेव पर्याय आहे.