हे हनुमंता, हिंदु राष्ट्र स्थापण्या दे आम्हा दास्यभाव अन् क्षात्रभाव यांचे वरदान !

पू. संदीप आळशी

‘रामचरणांच्या नित्य अनुसंधानात रहाणार्‍या महातेजस्वी हनुमंता, रामभक्ती आणि वीरवृत्ती यांच्या बळावर तू राक्षसांचा निःपात करून रामरायाचे धर्मसंस्थापनेचे ध्येय पूर्ण केले. आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रामराज्याचे (हिंदु राष्ट्र-स्थापनेचे) ध्येय पूर्ण करण्याकरता त्या कार्यात बाधा आणणार्‍या सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींना हरवण्यासाठी आम्हा साधकांनाही तू दास्यभाव आणि क्षात्रभाव यांचे वरदान दे !’

सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’.  साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.